
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र, हा अपघात होता की घातपात? असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. तर दुसरीकडे, विनायक मेटेंना रात्रीतून मुंबईला कुणी बोलावलं याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.














