शिंदे-फडणवीस सरकारचे 'दिवाळी गिफ्ट' रेशन दुकानात कधी मिळणार ?

कणकवली तालुक्यात आहेत 73 दुकाने | एकाही दुकानात नाही पोहोचले किट !
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2022 21:29 PM
views 171  views

कणकवली : महागाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी दिवाळीत शंभर रुपयात  चार वस्तू गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही रेशन कार्ड या गिफ्ट उपलब्ध झाल्या नसल्याने रेशन कार्डधारकांची हेळसांड होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये या चार गोष्टी आल्या तर काही तालुक्यांमध्ये चणाडाळ व तेल आले नाही त्यामुळे शासकीय गोदामात केवळ साखर आणि चणाडाळ येऊन पडली आहे .परंतु पामतेल आणि रवा अद्यापही आलेला नाही. त्यामुळे या वस्तूंचे किट वाटप दिवाळीनंतर वितरित होणार की काय, असा प्रश्न पडला आहे.

कणकवली तालुक्यात एकूण 73 धान्य दुकाने असून या धान्य दुकानांवर हे किट पोहोचण्यासाठी अजून तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे तसेच पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली तालुक्यात रेशन कार्ड धारकांची संख्या  39453 आहे .यामध्ये पांढरी रेशन कार्ड   4783,अबोऊ पॉवर्टी लाईन ( apl) 6885, प्राधान्य कुटुंब संख्या ( phh) केशरी व अंत्योदय (aay) मिळुन  27785, अशी रेशन कार्डधारकांची संख्या  39453 असून यांच्यापर्यंत हे किट कधी पोहोचणार याचं उत्तर आता प्रशासनाकडून मिळणे अपेक्षित आहे

सरकारने महागाई ने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शंभर रुपयात साखर पामतेल, रवा ,चनाडाळ या चार वस्तूंचे कीट देण्याचा निर्णय घेतला. परंतु दिवाळी दोन दिवसावर येऊन ठेपली तरीही रेशन कार्डधारकापर्यंत हे किट पोचलेले नाही.

कणकवली तालुक्यात एकूण 73 धान्य दुकाने असून या दुकानांवर अजून देखील हे किट न पोचल्याने रेशन कार्ड धारक देखील या दुकानदारांना किट उपलब्ध झाले की नाही या संदर्भात सातत्याने विचारत आहेत.