मुंबई : जून महिन्यात उशिराने आलेला मान्सून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली मोठी विश्रांती यामुळे पावसाचा तुटवडा अजूनही आहेच. तरीही आता मान्सूनच्या परतीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून राज्यात मान्सून परतणार आहे. तर राजस्थनातून एक ऑक्टोबर रोजी मान्सूनच्या परतीची तारीख होती परंतू मान्सूनच्या लहरी पणामुळे तारीख बदली आहे. २० ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील मराठवाड्यात तब्बल पाच दिवस पावसाची कमतरता राहणार आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात फारशी पावसाची शक्यता कमी आहे. १ ते ७ सप्टेंबर मध्ये पाऊस जोरदार नसेल परंतू तूरळक ठिकाणी हलका पाऊस या दरम्यान होत राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ५ सप्टेंबर पर्यंत हलका पाऊस होत राहिल तसेच तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.