मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनाावणी घेतली. जवळपास अडीच तास सुनावणी सुरू होती. शिंदे गटाच्या वकिलांनी प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी अशी मागणी केली. तर, ठाकरे गटाच्या वकिलांनी या मागणी जोरदार विरोध केला. आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित सुनावणी होईल, याबाबतचा निकाल 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष सुनावण्याची शक्यता आहे.
याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाच्या वडिलांकडून याचिकांमधील मुद्द्यांची मांडणी करण्यात आली. तब्बल अडीच तास सुनावणी सुरू होती.