तुम्हा सर्वांसाठी आम्ही शिवधनुष्य पेलले !

मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेशी साधला संवाद !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 26, 2022 20:27 PM
views 188  views

ब्युरो न्यूज : आमचे सरकार जनतेच्या मनातील सरकार असून त्यासाठी जनतेत जाऊन सोबत जाण्याची तयारी आमची आहे. हा एक टप्पा आहे, अजून मोठी मजल मारायची आहे. नैसर्गिक आपत्तीने मी डगमगलो नाही. अतिवृष्टीबाधित तीस लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत केल्याचा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिपावलीनिमित्त फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


निर्बंधमुक्त सण, उत्सव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज आपण प्रकाशाचा उत्सव साजरा करीत आहोत. दिवाळीचा सण सर्वांच्या आयुष्यात समाधान लाभो. कोरोनाचे निर्बंध थांबल्यानंतर आता आपले जीवनचक्र सुरळीत झाले आहेत. सकारात्मक बदल होत आहेत. कामाला गती मिळत असून आपण सर्व सण निर्बंधमुक्त सण साजरी करीत आहोत.


सामान्यांचे सरकार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ आता संपत आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांवर हे सरकार पुढे जात आहे. शोषित, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे सरकार बांधिल आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनातील, आपले, सर्वसामान्यांचे सरकार आहे. आमची वाटचालही अशीच सुरू आहे.


डगमगलो नाही

मुख्यमंत्री म्हणाले, आपत्तीने डगमगलो नाही. योजनाही तशाच राबवल्या याचे समाधान आहे. ज्येष्ठांना मोफत एसटी बस सेवा योजना, आनंद शिधा हे पॅकेज दिवाळीत दिले. अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफ


30 लाख शेतकऱ्यांना मदत

मुख्यमंत्री म्हणाले, ​​​​​​​30 लाख शेतकऱ्यांना 4 हजार कोटींची मदत, निकषात न बसणाऱ्या पण पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना 735 कोटींची मदत देत आहोत. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली जात आहे.


मुख्यमंत्री म्हणाले..

  • वीस हजार पोलिस शिपायांची पदे भरणार,
  • पोलिसांच्या घरांच्या किमती पन्नास लाखांवरून पंधरा लाखांवर
  • ​​​​​​​माता सुरक्षित, घर सुरक्षित योजना
  • समृद्धी महामार्गाचे लवकरच उद्घघाटन.
  • एमएमआरडीएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी साठ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी
  • ​​​​​​​मुंबईचे सहाशे किमीचे रस्ते क्राॅंक्रीटचे होणार