आरोग्यमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते : विनायक राऊत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 09, 2023 12:27 PM
views 426  views

कुडाळ : आरोग्य मंत्र्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. त्याना कशाच काही पडलेल नाही. त्यांच्यात खरच हिंमत असेल तर त्यांनी सगळ्या शासकीय रुग्णालयांना भेट द्यावी, तेथील रूग्णांशी बोलाव. सिंधुदुर्ग सह सगळ्या रूग्णालयात 100 रूपयांच औषध सुद्धा बाहेरून आणाव लागत आहे. दयनीय अवस्था आरोग्य यंत्रणेची झाली आहे. त्यामुळे खाजगी रूग्णालयात जाव लागत आहे. यापूर्वी अशी स्थिती नव्हती. दुर्दैवाने सध्याच आरोग्य मंत्र्यांना  त्याच देणघेण नाही. स्वतः च भल व चेल्यापेल्याची टक्के वारी भली या भुमिकेत आहेत अशी टीका रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी कोकणसाद शी बोलताना केली आहे. 


सध्याचे आरोग्यमंत्री हे बेफिकीर आहेत. त्यांच्यामुळे सगळा बट्ट्याबोळ झाला आहे. एन आर एच एमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना चांगली सोय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना रत्नागिरी सिंधुदुर्गत चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. ते म्हणाले ,आरोग्यासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी सत्ताधारी आमदार, पालकमंत्री कमी पडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा्याला जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाल आहे त्याची दुरवस्था करणारे काही वरिष्ठ अधिकारी येथे पाठवले आहेत. जिल्हा रुग्णालय व डिन यांच्या भांडणात रूग्ण भरडले जात आहे. डिनना याच काहई पडलेल नाही. त्यांच्यामुळे सगळी यंत्रणा बिघडली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी डीन ची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

नारायण राणेंना स्वतःच्या रूग्णालयाची व ते कसे भरभराटीस येईल याची चिंता पडली आहे. गोरगरीबांच्या आरोग्याच त्यांना काही पडलेले नाही अशी टीका रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यातील भेटीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी वेताळाक नाय होती बायल. काळक्याक नाय होतो घोव अशी टीका केली आहे.

तर उद्योगमंत्र्याना आडाळी कुठे आहे हे तरी माहिती आहे का? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला. आडाळी एम आय डी सी बाबत उदय सामनत यानी दिलेल्या विधानपरिषदेतील उत्तरावर खासदार बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदारांवर देखील टीकास्त्र सोडल‌ आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पुर्णत्वास आणण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तर कोकण रेल्वेचा विकासासाठी भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेच विलीनीकरण कराव अशी मागणी केली आहे. ते करताना कोकण विभाग वेगळा ठेवावा अशी मागणी केली आहे.