सावंतवाडी : सावंतवाडी येथील वरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आयएसओ 9001 आयएसओ 27001 हे मानाकन प्राप्त झाले आहे. असं मानांकन मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली आयटी कंपनी ठरली आहे.
सावंतवाडी येथे वरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे गेली चार वर्षे काम सुरू आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात या कंपनीने आपलं आयटी क्षेत्रातील नेटवर्क उभा केल आहे. या आयटी नेटवर्कच्या माध्यमातून अनेक उपक्रम सिंधुदुर्गात राबवले जात आहेत आणि याच कामाचा गौरव झाला असे म्हणावे लागेल. आय एस ओ 9001, ISO 27001 मानांकन प्राप्त झालं आहे. कोकणातील एखाद्या आयटी क्षेत्रातील कंपनीला ISO 27001 हे मानांकन मिळालेली वरेनिअम ही पहिली कंपनी ठरली आहे. यात Edmission ,Hydra ,TUG Digital या ब्रँडसाठी Varanium Cloud Ltd (NSE Emerge: CLOUD) ला प्रतिष्ठित ISO 27001 : 2022 आणि ISO 9001: 2015 प्रमाणपत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती आज प्राप्त झाली आहे.
ISO 27001 हे माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली क्षेत्रातील (ISMS) साठी जगातील सर्वात प्रसिद्ध मानांकन आहे. ISO 27001 च्या अनुरूपतेचा अर्थ असा आहे की एखाद्या संस्थेने किंवा व्यवसायाने कंपनीच्या मालकीच्या किंवा हाताळलेल्या डेटाच्या सुरक्षेशी संबंधित जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रणाली स्थापित केली आहे आणि ही प्रणाली या आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व सर्वोत्तम पद्धती आणि तत्त्वांचा आदर करते. ISO 9001 गुणवत्ता व्यवस्थापनासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानक आहे. ISO 9001 ची अंमलबजावणी करणे म्हणजे निर्दोष उत्पादने किंवा सेवा वेळोवेळी वितरित करण्यासाठी कंपनीने प्रभावी प्रक्रिया आणि प्रशिक्षित कर्मचारी ठेवले आहेत.
वरेनियम या संस्थेचा गौरव !
वरेनियम क्लाऊड लिमिटेड या संस्थेला आयएसओ मानांकन मिळाला असल्याने कोकणात या संस्थेने गेल्या काही वर्षात केलेल्या कामाचा खऱ्या अर्थाने गौरव झाला आहे या संस्थेने अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि तज्ञ कर्मचारी वर्ग सुद्धा या कंपनीने ठेवला आहे