वैभव नाईकांच्या संपत्तीत तब्बल 300 पटींनी वाढ | पुराव्यांसह आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

कुडाळात नंगानाच करण्यापेक्षा ACB च्या चौकशीला सामोरे का जात नाही ?
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 18, 2022 17:05 PM
views 209  views

कणकवली : 2009 साली प्रॉपर्टी 1 कोटीची होती. 2014 साली नाईक यांची हीच प्रॉपर्टी 1 कोटीवरून 8 कोटींवर पोचली. 2019 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली प्रॉपर्टी 25 कोटींची असल्याचे सांगितले आहे. ह्या अधिकृत प्रॉपर्टी आहेत तर बेनामी प्रॉपर्टी 140 ते 150 कोटींची असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या भटक्या कुत्र्यांनी कुडाळमध्ये आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हा नपुंसक आहे. स्व. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याचे धाडस उद्धवमध्ये नाही. उद्धवला असे सोंगाडे लागतात, अशा खरमरीत शब्दांत टीका करत आक्रमक झालेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

आईस्क्रीम कोनचा आणि आदित्य ठाकरेचा काय संबंध, हे दिनो मारिओला विचारा. दोघेही रिझवी कॉलेजच्या मागे बसून हे आईस्क्रीम कोन खायचे. उद्धव ठाकरेचे रक्त थंड आहे. म्हणूनच त्याला आईस्क्रीम कोन निशाणी निवडणूक आयोगाने दिला.

भास्कर जाधव शिक्षकाचा मुलगा स्वतःला म्हणवतात. पण शिक्षकांचा मुलगा असा करंटा कसा निघाला ? आमदार वैभव नाईकची एसीबी चौकशी का सुरू आहे ? एकीकडे चोरीमारी करून वैभव नाईक दोन नंबरची संपत्ती गोळा करणार आणि दुसरीकडे ही भटकी कुत्री येऊन राणेंवर गरळ ओकणार. सोंगाड्याना एकत्र करून नंगानाच आज कुडाळात केला. मुद्दा वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीचा होता. वैभव नाईक यांनी जनतेसमोर जाऊन आपण स्वच्छ प्रतिमेचा असल्याचे जाहीर करणे गरजेचे होते. मात्र राणे आणि भाजपावर तोंडसुख घेण्याचे मोर्चा काढून सुख घेतले.

वैभव नाईकची तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा माणूस होता.मग भालेकर ला वैभव नाईकविरोधात तक्रार द्यायला खासदार राऊत यांनीच भाग पाडले.  या माझ्या मुद्द्यावर विरोधक का बोलले नाहीत? असा सवाल नितेश राणेंनी केला. नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांचे वेळी सादर केलेले प्रतिज्ञापत्र सादर करत नाईक यांची 2009 साली प्रॉपर्टी 1 कोटी ची होती.2014 साली नाईक यांची हीच प्रॉपर्टी 1 कोटीवरून 8 कोटींवर पोचली. 

2019 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली प्रॉपर्टी 25 कोटींची असल्याचे सांगितले आहे.ह्या अधिकृत प्रॉपर्टी आहेत तर बेनामी प्रॉपर्टी 140 ते 150 कोटींची असल्याचा दावा आमदार नितेश राणेंनी केला. ही वाढलेली संपत्ती वैभव नाईक आणि चिपळूण वरून भाड्याने आलेल्या भटक्या कुत्र्यांनी एसीबीला उत्तर द्यावे. त्याऐवजी केंद्रीयमंत्री राणे, माजी खासदार निलेश राणे आणि माझ्यावर तसेच भाजपावर दात चावण्याला काय अर्थ ? असा सवालही नितेश यांनी केला.

वैभव नाईक यांच्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या नावाने सिंधुदुर्ग अलिबाग पुणे कोल्हापूर सातारा, पुणे येथे शेतजमीन 45 कोटी तर बिनशेती प्रॉपर्टी 35 कोटींची आहे.लोअर परेल मध्ये, दादर मध्ये, पुणे रायगड, अलिबाग, मुरुड येथील फ्लॅट ची 35 कोटी आहे. त्याशिवाय व्यवसायिक प्रॉपर्टी 80 कोटींच्या बाहेर आहे. 2009 ते 2019 या काळात आमदार वैभव नाईक यांची प्रॉपर्टी 300 पटीने वाढली असा एसीबीचा दावा आहे. हे आजच्या कुडाळमधील मोर्चात उन्हातान्हात सहभागी झालेल्या सामान्य शिवसैनिकांनी केला पाहिजे. याचा जाब एसीबी जे विचारला तर हे सोंगाडे आणि भटके कुत्रे मोर्चा काढतायत. एवढ्या बेनामी प्रॉपर्टी जर कोणी बनवल्या असतील तर त्याला चौकशीला सामोरे जावेच लागेल. या बेनामी प्रॉपरतीचे उत्तर त्या नपुंसक उद्धव ठाकरेंने, शिक्षकाच्या कारट्या भास्कर जाधवने द्यायला हवे. शेम्बड्या मुलासारखे रडत बसण्यापेक्षा हिंम्मत असेल तर भास्कर जाधवच्या मांडीवर बस आणि रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जा आणि उत्तर द्या, असे आव्हान आमदार नितेश राणेंनी वैभव नाईकना दिले. ज्या राणेंवर भास्कर जाधव टीका करतात ते जाधव स्वतःच्या मुलाला केवळ जिल्हा परिषद मध्ये पाठवू शकला. पण राणेंनी आपल्या मुलाला खासदार बनवले. मला दोन वेळा आमदार केले. राणे स्वतः मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री आहेत.भास्कर जाधव फक्त नगरविकास मंत्री होऊ शकले. अशा जहाल शब्दांत नितेश राणेंनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला. शिंदे सरकारमध्ये येण्यासाठी भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांनी किती खटाटोप केला हे आम्हाला माहिती आहे. त्यांना गेट आउट म्हणून सांगण्यात आले होते असा गौप्यस्फोटही नितेश राणेंनी केला.