नागपूर : नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज हजेरी लावली. पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते थेट CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. 7 मिनिट या दोघांची भेट झाली. मात्र यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात.
नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.