सावंतवाडी : सावंतवाडीत सालईवाडा काडसिद्धेश्वर भवन इथं प.पू. श्री. काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात शुक्रवारी श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळा संपन्न झाला. श्रावण मासाच्या सुरूवातीपासून या सप्ताहास सुरुवात झाली होती. विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम या निमित्ताने होत होते. या निमित्ताने समर्थ रामदासांनी लिहिलेला दासबोधाचही वाचन करण्यात येत. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरूमाऊली शोभाताईंच्या प्रमुख उपस्थिती हा सांगता सोहळा पार पडला. त्यांच्या प्रवचनासह आध्यात्माच्या मंत्रोच्चारात भक्तगण तल्लीन झाले.
काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या प.पू गुरूमाऊली शोभाताई यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. काकड आरती, भजन,आरती, संगीत कार्यक्रम, गुरूमाऊली शोभाताईंचे प्रवचन अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न झाला. शेकडो भक्तांनी यावेळी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी उपस्थित भक्तांना संत परंपरा व आध्यात्म यावर गुरूमाऊलींनी प्रवचन दिले. शोभाताईं म्हणाल्या, दासबोध हा गुरू शिष्याचा संवाध आहे. शिष्यानं न्यान प्राप्तीसाठी गुरूचा दास होण आवश्यक आहे. आपण देवाला बाहेर शोधतो, मात्र संत, देव हा स्वतःत शोधायला शिकवतात. देव हा माणसातच आहे. तर गुरुच्या सहवासातच खरं सुख आहे. आत्मबल हे जीवनात सर्वश्रेष्ठ आहे. गुरू काडसिद्धेश्वर महाराजांनी आम्हाला पूर्ण ज्ञानी केल आहे. त्यांनी दिलेलं ज्ञान माझ्यासोबत असून त्यांचा ज्ञानाचा प्रसार आध्यात्म अन् भक्तीमार्गातून आम्ही करत आहोत. गुरूंनी सांगितलेल्या वचनावर पाऊल टाकणं हे शिष्याच खरं कर्तव्य असतं, शिष्यानं न डगमगता ते वचन पाळायला हव. मनुष्य जन्मी आल्यावर गुरूंच्या सहवासात राहत परमार्थ साधावा, सद्गुरुंच्या विचाराचं आचरण, चिंतन, मनन कराव असा उपदेश गुरूमाऊली शोभाताई यांनी केला. यावेळी भाविकांनी त्यांच दर्शन घेतले. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातील काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येन उपस्थित होते.
यावेळी, १९९७ ला काडसिद्धेश्वर महाराज सावंतवाडीत आले होते त्यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांना सावंतवाडी शिवउद्यान इथ झालेल्या कार्यक्रमात तुमच्या नगराचा अध्यक्ष कोण ? असा प्रश्न विचारला होता. यावर दीपक केसरकर यांनी 'आत्मा' असं उत्तर दिलं होत. याचीही आठवण या कार्यक्रमात उपस्थितांनी उपदेश करताना केली. उद्या सकाळी वजराठ भोंसले यांच्या निवासस्थानी गुरूमाऊलींचा कार्यक्रम होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भक्तांकडून करण्यात आले आहे.