वैभववाडी : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, नागरिक यांना एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जुन रावराणे विद्यालय,ग्रामपंचायत एडगाव व तहसील कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांनी मिळून शहीदांना मानवंदना दिली.
मुंबईवर सन २००८ साली याच दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात वैभववाडीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील अधिकारी विजय साळसकर शहीद झाले होते. त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना वीरमरण आले होते. या हल्ल्यात निष्पाप नागरिक मारले गेले होते. या सर्वांना आज वैभववाडीत श्रद्धांजली वाहण्यात आली. एडगाव येथील साळसकर यांच्या स्मारकात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी जि.प.बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे,नायब तहसीलदार श्रीमती कासकर,एडगाव सरपंच रविना रविंद्र तांबे सदस्या. प्रज्ञा प्रमोद रावराणे , वैष्णवी विनोद रावराणे, स्मृती संतोष पवार, सायली सुनिल घाडी, ग्रामसेवक उमेश राठोड, सचिन रावराणे , अर्जुन रावराणे विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. शहीद साळसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. अ.रा.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विजय साळसकर अमर रहे अशा घोषणा दिल्या.