मुंबई : विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीची मुंबईत गुरुवारी ३१ऑगस्टला आणि शुक्रवारी १ सप्टेंबरला तिसरी बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील एकूण २६ पक्ष उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले असून या दोन दिवसीय बैठकीत वेगवेगळ्या महत्त्त्वाच्या मुद्द्यांव चर्चा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीच्या मानचिन्हाचे (लोगो) अनावरण केले जाणार आहे.
विरोधकांच्या या दोन दिवसीय बैठकीत मानचिन्हाच्या अनावरणासह संयोजकपदी योग्य नेत्याची नेमणूक, आघाडीची औपचारिक रचना, भविष्यातील रणनीती अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संयोजकपदाच्या निवडीवरून या आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. अनेक प्रमुख पक्ष या पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे संयोजकपदावरही कोणाची निवड होणार? या मुद्द्यावर काय तोडगा काढला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.