महाराष्ट्राच्या विकासाआड येणा-यांचा बळी देणार !

मंत्री दीपकभाईंचं अजितदादांना ठोस उत्तर | शिंदे मंत्रीमंडळ गुवाहाटीला रवाना
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 26, 2022 10:08 AM
views 482  views

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळ आज दहाच्या सुमारास गुवाहाटीला रवाना झालं. देवीचं दर्शन घेवून राज्यातील जनतेच्या भल्यासाठी आशिर्वाद घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दरम्यान, या दौ-यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, तुम्ही कोणाचा बळी देणार? याला मंत्री दीपक केसरकर यांनी ठोस उत्तर दिलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाआड येणा-यांचा बळी देणार !