दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते..

शिंदे गटाने वाहनांवर १० कोटी खर्च केल्याच्या आरोपवर काय म्हणाले केसरकर..
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 04, 2022 20:33 PM
views 551  views

सिंधुदुर्ग : राज्यातील लोकांना दसरा मेळाव्यासाठी येता यावं, यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या १८०० बसेस बूक करण्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे. दसरा मेळाव्याच्या माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची नसते, ती आपोआप होत असते. जो जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे असंख्य लोक मेळाव्याला येऊ इच्छित आहेत. त्यांना दसरा मेळाव्याला यायचं असेल तर त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था केली आहे. प्रत्येकजण स्वत: तिकीट काढत असतो. पण दसरा मेळाव्याला येण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने पैसे भरले किंवा आमच्या शिवसैनिकाने पैसे भरले तर यासाठी कुणाला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.