तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट

लवकरच सेमी कंडक्टर, ग्रीन एनर्जी व इलेक्ट्रिकल व्हेईकल बाबत होणार सामंजस्य करार
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 13, 2022 16:09 PM
views 350  views

मुंबई : तैवानचे भारतातील राजदूत बौशुआन गेर व शिष्टमंडळ यांनी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी सामंत ह्यांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले असून यावेळी गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासमयी लवकरच सेमी कंडक्टर, ग्रीन एनर्जी व इलेक्ट्रिकल व्हेईकल बाबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे सामंत ह्यांनी म्हटले.