सांगली : चार पिढ्यांची परंपरा असलेला आणि उत्तुंग शाहीरी वारसा लाभलेला कडकडीत आवाज रविवारी (दि. १५) शांत झाला. शिव शाहीर, शाहीर रत्न अशा नाना उपाध्या मिळालेले आणि आयुष्यभर शाहीरी काव्यातून रसिकांचे मनोरंजन करणारे आणि शिव प्रेरणा जागवणारे शाहीर आदिनाथ विभूते त्यांचे रविवारी रात्री निधन झाले.
गेले काही महीने ते हृदय रोगाने त्रस्त होते. रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास त्यांचे सांगली, बुधगाव येथे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने समस्त लोकरंगभूमी शोकाकुल झाली आहे.