कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी केसरकरांकडून मुश्रीफांकडे !

Edited by: ब्युरो
Published on: October 04, 2023 17:46 PM
views 332  views

कोल्हापूर: गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरचे पालकमंत्री पद भूषवण्याचा स्वप्न पाहणाऱ्या हसन मुश्रीफ यांच अखेर आज स्वप्न पूर्ण झालं आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीमध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची माळ ही आमदार हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आलीय. 


भाजप आणि शिंदे गटांसोबत अजित पवार यांचा गट सहभागी झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं. मात्र, यामुळे शिंदे गटातील मंत्री पदाची स्वप्न पाहणारे आमदार नाराज झाले होते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अजित पवार गटातील नेत्यांना मंत्रिपद मिळवून देखील पालकमंत्री पदावरून सुरु असलेला तिढा सुटत नव्हता. मात्र, आज हा तिढा सुटला असून यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासूनच कोल्हापूरचे पालकमंत्री पद भूषवण्याचं स्वप्न पाहणारे नेते हसन मुश्रीफ यांच स्वप्न पूर्ण झालं आहे. अपवादात्मक वगळता गेले २५ वर्ष आमदार आणि मंत्रिपद भूषवलेले कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रि पदाची माळ पडली आहे.


सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :


पुणे - अजित पवार


अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील


सोलापूर - चंद्रकांत दादा पाटील


अमरावती - चंद्रकांत दादा पाटील


वर्धा - सुधीर मुनगंटीवार


भंडारा - विजयकुमार गावित


बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील


कोल्हापूर - हसन मुश्रीफ


गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम


बीड - धनंजय मुंडे


परभणी - संजय बनसोडे


नंदूरबार - अनिल भा. पाटील