राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात !

आरोग्य विभागाची माहिती
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 13:06 PM
views 238  views

मुंबई : राज्यात सोमवारी २८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, ही वाढ वेगाने होत नसून रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. सोमवारी नोंदवल्या गेलेल्या बाधितांपैकी ५५ टक्के बाधितांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. राज्यात सोमवारी तेरा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात एक्सबीबी १.१६ या व्हेरिएन्टचे १९७२ रुग्ण आढळले आहेत. जेएन-१ या उपप्रकाराच्या रुग्णांची संख्या दहा आहे.