महाबळेश्वर : डिजिटल मिडीया संपादक, पत्रकार संघटनेचे देशातील पहिले राज्यस्तरीय अधिवेशन भिलार या माझ्या गावी होत आहे याचा आनंद होत आहे. देशातील पहिल पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारी गावाची आशिवेशनासाठी केलेली निवड योग्य आहे. डिजिटल मीडियाचे प्रश्न, समस्या ह्या राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील. बातमीची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. एक आदर्श आचारसंहिता सर्व घटकांसाठी या संघटनेने करावी. डिजिटल मीडिया ही काळाची गरज आहे. आपण एक डिजिटल क्रांती घडवूया. राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व उपक्रम लोकापर्यंत पोहोचवा. डिजिटल चॅनेलच्या परवानगी बाबत केंद्र सरकारशी चर्चा करून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून डिजिटल चॅनेलच्या समस्या मार्गी लावणार, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर येथे सुरु आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डिजिटल पद्धतीने ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.