सीमाप्रश्न पेटला ! दोन्ही राज्यांच्या 500 हुन अधिक बसेस बंद !

निषेध, निदर्शने आणि बसेसना काळे फासण्याचा प्रकार
Edited by: लुईस रॉड्रिगीस
Published on: November 25, 2022 19:10 PM
views 525  views

बेळगाव : कर्नाटक व महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नावर मागील दोन दिवसांत स्फोटक वक्तव्ये केल्यामुळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. त्यामुळे एकमेकांच्या बसेसना काळे फासण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. कर्नाटकाच्या केएसआरटीसी बसला महाराष्ट्रात दौंड येथे मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. त्याचीच री ओढण्याचा प्रकार कर्नाटकच्या हद्दीत कन्नड कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. परिणामी दोन्हीं बाजूच्या 500 हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. यामुळे सीमाभागातील प्रवाशांची कुचंबणा होत आहे.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुहा उफाळला आहे. त्यामुळे एकमेकांच्या बसेसना काळे फासण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.होय, महाराष्ट्र कर्नाटकात कळीचा मुद्दा ठरलेला बेळगावचा सीमावाद पुन्हा एकदा उफाळला आहे. कर्नाटकाच्या केएसआरटीसी बसला महाराष्ट्रात दौंड येथे तिथल्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या सीमाप्रश्नी प्रक्षोभक विधानाचा निषेध केला आहे. त्याचीच री ओढण्याची तयारी कर्नाटकाच्या हद्दीत कानडी पुंडानी चालवली आहे. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र बसेसजवळ आणि कर्नाटकात अचानक काळ्या काजळीचा प्रादुर्भाव झाल्याने 300 हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. एमएसआरटीसीच्या बसेस बेळगाव, चिक्कोडीसह राज्याच्या अनेक भागात धावतात. त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.