ब्युरो न्यूज : महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांपासून पावसाने उसंती घेतल्याचे चित्र नजरेस येत आहे.काही भागामध्ये कुठे ढगाळ वातावरण असले तरी अनेक ठिकाणी पावसाने सुट्टी घेतल्याचे दिसून येते आहे.या बाबतीत विदर्भाचा विचार करता पूर्वेकडील जिल्हांमध्ये पावसाचे वातारवण सर्वत्र आहे.जेष्ठ हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस कधी बरसेल हे सांगितले आहे .
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रमधील काही जिल्हांमध्ये महाराष्ट्राचा मध्य-भाग आणि मराठवाडा भागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.येथील काही जिल्हांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज केला जात आहे.कोंकणात आणि गोवामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रमध्ये काही जिल्हात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.आत्ताचा विचार करता तामिळनाडूमधील समुद्र किनारे असलेल्या भागात चक्राकार वाऱ्यांची निर्मित होत आहे. यामुळेच अरबी समुद्राच्या मध्यावर पूर्व-पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत आहे.या कारणाने देशासह महाराष्ट्रातील पावसावर याचा परिणाम होताना दिसत आहे.पुढील २४ तासांमध्ये राज्यातील विदर्भ ,दक्षिण मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा अशा अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ज्यामुळे लातूर ,जालना ,सोलापूर,परभणी,नांदेड ,वर्धा,यवतमाळ ,नागपूर ,चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाची जोरदार हजेरी असणार आहे .