मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेने राज्यभरात महाप्रबोधन यात्रेची घोषणा केली आहे. राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना असे विखुरलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या यात्रेचे आयोजन केले असून बंडखोरीचे जनक एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जाहीर सभेने या यात्रेला सुरुवात होणार आहे.
ठाण्यातील टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून तेथील भाषणाने महाप्रबोधन यात्रेचे सुरूवात होणार आहे. तसेच महाप्रबोधन यात्रेची सांगताही उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेने होणार आहे. या यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेनं होणार आहे. गणपती उत्सवानंतर या यात्रेला सुरूवात होणार आहे.