
कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात 14 देशी बनावटीच्या पिस्तुल जप्त करण्यात पाेलिसांना यश आले आहे. या कारवाईची माहिती एसपी समीर शेख यांनी माध्यमांना दिली. ही कारवाई सातारा गुन्हे अन्वेषण विभाग आणि कराड पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. या टाेळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसपी समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनूसार कराड विटा मार्गावर जनाई मळाई मंदिर या ठिकाणी काही लाेक दराेड्याच्या उद्देशाने जमले हाेते. हे सर्वजण दराेडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती समजातच एका खास पथकाने सापळा रचून सर्वांना अटक केली. या टाेळीत एक कराडमधील गुन्हेगार असल्याचे समजते. संशयित आराेपी यांच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये किमतींची पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत, असेही शेख यांनी नमूद केले.