
सिंधुदुर्गनगरी : सन २०२६ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना लागू होणाऱ्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबत अधिकृत अधिसूचना काढली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी यांनी महसुली हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांसाठी या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी गौरी पूजन आणि ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे.
या तीनही सुट्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लागू असतील. संबंधित विभागांना अधिसूचनेची प्रत पाठविण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.










