सिंधुदुर्गनगरी : गडहिंग्लज येथील शिक्षक विजय गुरव खुनप्रकरणी त्याची पत्नी विजयालक्ष्मी गुरव आणि सुरेश चोथे या दोघांना जन्मठेप सुनावली आहे. ओरोस येथीलप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी याबाबत निकाल दिला. अत्यंत गाजलेल्या गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज जिल्हा व सत्र न्यायाधीशएस व्ही हांडे यांनी जन्मठेप दिली आहे.
विजय कुमार गुरव यांची निर्गुण हत्या करून आंबोली येथील कावळेसाद पॉईंट वरून त्यांचा मृतदेह ढकलून देण्यात आला होता. याबाबत येथील बाबल अल्मेडा यांच्या टीमने हा मृतदेह बाहेर काढल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. यामध्ये विजयकुमार गुरव यांची पत्नी विजयालक्ष्मी गुरव व सुरेश अपय्या चोथे यांना अटक करण्यात आली होती. व त्यांच्यावर दोषारोप दाखल करण्यात आला होता 6 नोव्हेंबर 2017 ला ही घटना घडली होती या प्रकरणी सुनावणी झाल्यावर आज तब्बल पाच वर्षांनी या केसचा निकाल लागला आहे.