तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला..!

Edited by:
Published on: August 18, 2023 15:55 PM
views 807  views

नाशिक: राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून सुरू झालीय. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. या ठिकाणी हायटेक कॉपीचा प्रकार पोलीसांनी उघड केलाय.