भाजप ही 'भ्रष्ट जुमला पार्टी' ; झब्बे मे कॅश चल रहा है : खा. सुप्रिया सुळे

अर्चनासाठी मागणी 'मविआ'च्या बैठकीत ताकदीनं मांडणार !
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 13:08 PM
views 257  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. भाजपातच सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. 


त्या म्हणाल्या, कोकण आणि पवार कुटुंबांचे दहा दशकांचे ऋणानुबंध आहेत. इथली भाजी, माशाच कालवण याशिवाय जेवण झाल असं म्हणता येणार नाही. मी जन्मापासून सिंधुदुर्गात येते‌. आईचं आजोळ याच भागात, त्यामुळे इथल्या संपूर्ण भागाची आस्था आणि कोकणची आवड आमच्या संपूर्ण कुटुंबात आहे. कोकणात संसदरत्न म्हणून उल्लेख होतो तेव्हा उर भरून येतो. बॅ. नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांच भाषण पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यासून आम्ही घडलो. आज त्यांच्या कोकणात आल्यावर मिळणार प्रेम पाहुन खासदारकीच सार्थक झाल्याची भावना मनात आहे‌. बॅरिस्टर नाथ पै आणि मधू दंडवते यांनी लोकसभेत पार्लमेंट मध्ये केलेलं काम आणि त्यांची भाषणे त्याला तोड नाही. इंटरनेट गुगल शिवाय त्यांनी केलल काम याचा सार्थ अभिमान आणि प्रचंड आदर आहे. कोकण रेल्वे सुधारली पण रस्ता नाही सुधारला. तो कधी सुधारेल यांचा कौल लावून बघा. अर्चना घारे आपल्या जन्म भुमिसाठी काहितरी करू इच्छित आहे. तीला तुम्ही देत असलेल प्रेम पाहुन अभिमान वाटत आहे. तिचं काम पहाता, महाविकास आघाडीची चर्चा होईल तेव्हा अर्चना घारेंबाबत जी मागणी तुम्ही केली ती ताकदीने मा़ंडली जाईल अस विधानं खा. सुप्रिया सुळे यांनी केल.


अमित सामंत यांनी झब्बा कुणाचा म्हंटलं आणि त्यात पैसे कुठून आले ते समजलं नाही. माका ता समजला नाय, कुणाचा जॅकेट समजला नाय. मोदींनी नोट बंदी केली. मग, जॅकेटमध्ये खिशात हात घालून पैसे येतात कुटून ? मोदीजींना हे सांगावं लागेल. मोदीजी कोकण मे कूछ तो गडबड है, झब्बे मे कॅश चल रहा है. हे पन्नास खोके वाले असतील पण, ५० खोके इस नॉट ओके म्हणत भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. मोदी नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणायचे. पण, आता झालेला बदल दिसतो. राष्ट्रवादी हा भ्रष्ट पक्ष नाही हे मोदींनीच स्पष्ट केले. शरद पवार यांच नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होणार नाही हे मोदींना ठावूक आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा भारतीय जनता पार्टी पक्षातच आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. ट्रीपल इंजिन सरकार शाळा कमी करून दारूची दुकानं वाढवत आहेत. 


ट्रीपल इंजिन पन्नास खोक्यांच आहे ते शाळा बंद करतात आणि दारूची दुकान वाढवत आहे. शिक्षणमंत्री केवळ मोठ पद मिरवत आहेत. शाळा सोडून दारूची दुकान प्रमोट करत आहेत. शिक्षक पदे रिक्त तिथं निवृत्त झालेले लोक भरत आहेत.

जे बाळासाहेब, पवारसाहेबांचे झाले नाही त्यांच्यापासून एकनाथ शिंदे यांनी सांभाळून रहावं असं आवाहन केलं. हळुहळु बोलायची सवय असणारे खंजीर खुपसून गेल्यावरच कळतात असा टोला दीपक केसरकर यांच नाव न घेता त्यांनी लगावला. ज्यांचं नाव सांगून पार्टी सोडली आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावून भाषण करत आहेत‌.जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असं मत व्यक्त केले. तर मी रामकृष्ण हरी वाली आहे‌. खोटं बोलायला जमत नाही. निष्ठा ठरली की ठरली. सत्ता प्रिय नाही. संघर्षात खरी मजा आहे. बाळासाहेबांनी हयात असताना पक्ष उद्धवजीना दिला. मग, ह्यांना काय अधिकार उद्धवजींकडून पक्ष काढून घ्यायचा ? भाजप तुमचा आईस करून टाकणार. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि इडी ह्या दिल्लीच्या अदृश्य शक्ती तुमच्या मागे लागणार. एमआयडीसीत उद्योग का नाही आले. नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी एमआयडीसी आणली. मग, विकास का झाला नाही. गोड बोलून, बुके घेऊन धावत काम होत नाही. एक उद्योग आणता येत नसला तर तुमच्या आमदाराचा मंत्री होऊन फायदा काय ? इथ PRO नको तर मंत्री म्हणून काम करणारा आमदार पाहिजे आहे.  याचा विचार करा, ह्यात चुक आमचीही. दोनवेळा घड्याळावर निवडून आणले. पण, घात करतील अस वाटलं नव्हतं असा टोला खा. सुळे यांनी हाणला. 


मी स्वाभिमानी मुलगी आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणारही नाही. 

मराठी माणूस कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. सगळ्या नोकऱ्या, कंपन्या, उद्योग सगळे गुजरातला गेले. फिल्म इंडस्ट्री उत्तरप्रदेशमध्ये, कोणीही येऊन टपरी मारून जावं हे नाही खपवून घेणार, हे खोके सरकारला ते चालत असेल पण महाविकास आघाडीला नाही चालणार. इथून पुढे नोकऱ्या उद्योग धंदे बाहेर गेल्यास खोके सरकार आणि मुख्यमंत्री यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा त्यांनी  दिला.


भाजप पक्ष घाबरला आहे. लोकशाही टिकायला हवी त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. बाळासाहेबांच्या पक्षाच काय केलं ? शरद पवारांच्या पक्षांचं काय केलं ? दिल्लीत नितीन गडकरींच काय केलं ? १०५ जण असताना देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं ? सगळेच मराठी माणूस. आणखीन एक उपमुख्यमंत्री आणून महत्त्व कमी केलं. सगळी मराठी माणसं आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे. आणि त्यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती कार्यरत आहे असा टोला सुळेंची हाणला. राज्यातल ट्रीपल इंजिन सरकार पापी, खुनी सरकार आहे‌. जुमलेबाजी हा त्यांचा धंदा आहे. महाराष्ट्र व मराठी अस्मिता वाचवायची असेल तर हा लढा द्यावा लागेल. एका इलेक्शन मध्ये यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करू, लढेंगे और जितेंगे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, महीला अध्यक्ष रेवती राणे, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, सुभाष लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते