सिंधुदुर्ग : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीनं लढविणार असल्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड येऊन गेले. तर येत्या 27 ऑक्टोबरला संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या सावंतवाडी मतदारसंघात दोडामार्ग व सावंतवाडी येथे येत आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
पक्षान हा मतदारसंघ लढविण्याच गांभीर्याने घेतले आहे. त्याच्या पुर्वतयारीसाठी व कार्यकर्त्यांच मनोबल वाढवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्या विनंतीनुसार पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांनी हा मेळावा घेण्याचा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी दोडामार्ग महालक्ष्मी हॉलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. त्याआधी बांदा येथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. मेळाव्यानंतर दोडामार्ग येथील हत्ती प्रश्न व आडाळी एमआयडीसी संदर्भातील शिष्टमंडळ सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असून संसदेत त्यांनी हा प्रश्न मांडावा यासाठी ते भेट घेणार आहेत.
यानंतर सावंतवाडी येथे महाविकास आघाडीचा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याठिकाणी सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असून तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा होणार आहे. यावेळी इंडिया आघाडीचा मित्रपक्षांनी देखील उपस्थित रहावे अस आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस, सावंतवाडी तालुकध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.