अजितदादा पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आमदार नितेश राणे यांचं जोरदार आंदोलन

विजयदुर्ग इथं समुद्रात ढकलले दोन्ही पुतळे
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 03, 2023 19:10 PM
views 323  views

देवगड : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक व्यक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. किल्ले विजयदुर्ग येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा किल्ले विजयदुर्ग येथून  कडेलोट करून निषेध करण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे  व भाजप कार्यकर्ते यांच्यांकडून करण्यात आला. या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केला. यानंतर विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी देखिल पुतळा जाळण्याचा प्रयत्नाला पोलिसांकडून विरोध करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, संदीप साटम, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, देवगड शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी सभापती रवी पाळेकर, योगेश पाटकर, अरीफ बगदादी, मुफीत बगदादी देवगडच्या नगरसेविका तनवी चांदोसकर, माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, भाजप विजयदुर्ग शक्ती केंद्र प्रमुख ग्रेसीस फर्नांडिस, बूथ प्रमुख निलेश मणचेकर, प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य शुभा कदम, दिनेश जावकर, प्रतिक्षा मिठबावकर, पुर्वा लोंबर, वैशाली बांदकर तसेच पप्या मिठबावकर, दशरथ विनायक चोडणेकर आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, अजित दादा पवार  यांनी जर पुन्हा अपमानास्पद व्यक्तव केले तर त्यांना फिरकू देणार नाही, खासदार अमोल कोल्हे बोलतात म्हणून अथवा स्क्रिप्ट वाचतात म्हणून अजित पवार यांनी बोलू नये. अजित पवार यांनी जरी किती म्हटले तरी आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शिवसेनेबददल बोलताना त्यांना आता कोणताही हिंदू धर्माचा अभिमान राहिला नसून छत्रपती संभाजी महाराजांबददल शिवाजी महाराजांबददल तुम्हाला अजित पवार अपमानकारक बोलत असताना राग येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे कशाला, असा प्रतिप्रश्न देखील आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

यावेळी विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आमदार नितेश राणे व भाजप कार्यकर्ते यांनी येऊन अजितदादा पवार व जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा विजयदुर्ग येथील मच्छी जेटीवरून समुद्रात ढकलून दिला