सिंधुदुगरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्याच उपस्थितीत सोमवारी १० एप्रिलला सायंकाळी ६.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनिय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.
हा सोहळा स्नेहबंध' सोहळा कार्यक्रम झाराप झिरो पॉईन्ट नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्गावरिल आराध्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसुळ, माजी खासदार व गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, जिजाई महिला सेवा संस्था ओसरगांव च्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहबंध सोहळा कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.