कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ३० जूनअखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल तालुक्यातील ३८ विकास संस्थांपैकी फोंडाघाट, नाटळ, तळेरे, कलमठ, शिवडाव, कलमठ, रामेश्वर विकास संस्था असलदे, आयनल, कोळोशी या विकास संस्थाचा गौरव आ. नितेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विकास संस्था सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना बँक राबवत असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग बँक विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने कणकवली येथे विकास संस्था सक्षमीकरण चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी सत्कार करण्यात आलेत. यावेळी व्यासपीठावर बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, तुळशीदास रावराणे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, संतोष कानडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते.
जून २०२२ अखेर १०० टक्के वसुली झाल्याबद्दल असलदे विकास सोसायटी चेअरमन भगवान लोके व संचालक मंडळाचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून आ. नितेश राणे व सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर, उपसरपंच संतोष परब, सोसायटी संचालक उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब , कांचन लोके, विठ्ठल खरात, सुनिता नरे, छत्रुघ्न डामरे, प्रकाश खरात, अण्णा तांबे,सचिव अजय गोसावी आदी उपस्थित होते.