शिंदेंची 'बाळासाहेबांची शिवसेना' | ठाकरे यांची 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' !

उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' ; शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याची सूचना !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 10, 2022 20:10 PM
views 617  views

नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला पक्षाची नावे दिली आहेत. तसेच चिन्हाबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे.  उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे.  एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र नव्या फ्रेश तीन चिन्हांचे पर्याय उद्यापर्यंत देण्याची सूचना केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते. अखेर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.