सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांचं मत
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 10, 2023 16:49 PM
views 176  views

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येत्या एक-दोन दिवसात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी यावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.


असीम सरोदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणं चुकीचं आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली.