शिंदे सरकारनं केल्या 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या !

शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 20, 2022 22:13 PM
views 246  views

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.


या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


धनंजय आर कुलकर्णी - पदस्थापनेच्या प्रतीक्षेत - पोलीस अधीक्षक, रत्नागिरी


पवन बनसोड- अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा-पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग


बसवराज तेली -पोलीस उप आयुक्त नागपूर शहर-पोलीस अधीक्षक,सांगली


शेख समीर अस्लम -अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली-पोलीस अधीक्षक, सातारा


अंकित गोयल-पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण


शिरीष एल सरदेशपांडे-पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण


राकेश ओला- पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर


एम. राजकुमार- पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव


रागसुधा आर.-समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी


संदीप सिंह गिल-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली - पोलीस अधीक्षक, हिंगोली


श्रीकृ्ष्ण कोकाटे- पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड


सोमय विनायक मुंडे - अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली - पोलीस अधीक्षक- लातूर


सारंग डी आवाड - पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा


गौरव सिंह - पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ


संदीप घुगे - समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई - पोलीस अधीक्षक, अकोला


रवींद्रसिंग एस. परदेशी - उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर


नुरुल हसन- पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा


निखील पिंगळे -पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया


निलोत्पल- पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली


संजय ए बारकुंड- पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे


श्रीकांत परोपकारी- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर


सचिन अशोक पाटील- पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद


राज्य पोलीस सेवा अधिकारी


लक्ष्मीकांत पाटील- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर


पराग शाम मणेरे- पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई


या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निघणार


(१) मोहित कुमार गर्ग, (२) राजेंद्र दाभाडे, (३) दीक्षितकुमार गेडाम, (४) अजय कुमार बन्सल, (५) अभिनव देशमुख, (६) तेजस्वी सातपुते (७) मनोज पाटील, (८) प्रविण मुंडे, (९) जयंत मीना, (१०) राकेश कलासागर, (११) पी. पी. शेवाळे, (१२) अरविंद चावरिया, (१३) दिलीप पाटील- भुजबळ, (१४) जी. श्रीधर, (१५) अरविंद साळवे, (१६) प्रशांत होळकर, (१७) विश्वा पानसरे (१८) प्रविण पाटील, या भा.पो.से. अधिका-यांची आणि (१९) निकेश खाटमोडे, रा.पो.से. या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.