
चिपळूण : विधानसभा निवडणूक निकालानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे, कोकणातील कोणते आमदार होणार मंत्री. १० डिसेंबर रोजी कोकणातील सर्व ज्येष्ठ नेते, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष आणि महिला मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान कोकणातील संघटना वाढीसाठी शेखर निकम यांना मंत्रिपद देण्याबाबत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत काय करता येईल याबाबत देखील चर्चा झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार म्हणून शेखर निकम हे निवडून आले आहेत आणि आज मंत्रिमंडळात शेखर निकम यांना स्थान दिले तर कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूण तालुका अध्यक्ष- नितीन ठसाळे, प्रदेश उपाध्यक्ष- जयंत खताते, अशोकराव कदम,प्रकाश पवार, अरविंद आंब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या- सौ.युगंधरा राजेशिर्के, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष - देवराज गरगटे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष राजू पोमेंडकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष बंटी वणजू, लांजा राजापूर अध्यक्ष- पंकज पुसाळकर, जमीर मुल्लाजी, मुजीब कादरी, गणपत चव्हाण, जिल्हा बँक संचालक - राजू सुर्वे, नितीन भोसले, सावर्डे माजी सरपंच- सुभाष मोहिरे ,अजित कोकाटे, माजी सभापती- शौकत माखझनकर, संजय चव्हाण, युवा अध्यक्ष- मयूर खेतले, मनोज जाधव, सचिन पाटेकर, सचिन साडवीलकर ,आल्हाद यादव , योगेश पवार, शिवराज पवार,विजय भुवड, स्वप्निल शिंदे, दिनेश शिंदे, सचिन कोल्हापुरे, सचिन बागवे, उदयसिंह विचारे, अजय नलावडे, महिला आघाडीच्या प्रिया विचारे, सरिता कोल्हापुरे वैशाली पाटील,, स्नेहल पाटणे,आरती कुंभार, मैनुद्दीन खलपे, आधी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेखर निकम यांना मंत्रिपद देण्याबाबत बोलताना दादांनी सांगितले की 40 अनुदानांमध्ये आठ मंत्री पद देताना माझी देखील कसरत होणार आहे. परंतु कोकणामध्ये संघटना वाढवायचे असल्याने नक्कीच यातून आपण काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिले. संघटना वाढीसाठी देखील जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक करून संघटना वाढीसाठी काही बदल करण्याचे संकेत देखील दादांनी दिले. अजितदादांच्या भेट आणि आश्वासन यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आहे.