सावंतवाडी : पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार, कारिवडे गावचे सुपुत्र सुनिल राघोबा सावंत यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास कारीवडे गावात आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कारिवडे गावातून तात्या सावंत आणि प्रमोद राऊळ हे दिल्लीला गेले असून शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव पंजाब येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ७:५५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून त्यांचे पार्थिव अडीच तासांच्या प्रवासानंतर सकाळी १०:२५ वाजता गोवा मोपा विमानतळावर पोहोचणार आहे. नंतर त्यांचे पार्थिव कारिवडे गावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.