मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रख्यात विचारवंत कुमार शिराळकर (वय ८१) यांचे रविवारी रात्री ८.३० वाजता डॉक्टर कराड हॉस्पिटल नाशिक येथे निधन झाले. २०१९ पासून ते कॅन्सरशी संघर्ष करत होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांंच्यावर पुणे, मुंबईपाठाेपाठ नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
त्यांच्या पार्थिवावर बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, (तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार) येथे आज (दि. ३ ऑक्टोबर) सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९७१ मध्ये अगदी तरुण वयापासून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींना संघटित करण्यासाठी कार्य केले. उच्चशिक्षित असूनही करिअरकडे न बघता आदिवासी श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रखर संघर्ष केला.