सिंधुदुर्ग : 18 व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा 2023 एस. आर. पी. एफ. ग्रूप नंबर 2 पुणे येथे पोलिस महासंचालक रजनीश शेठ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉग शो करिता महाराष्ट्रातील उत्कृष्ट व हुशार 8 डॉग ची निवड त्यात सिंधुदुर्गातील गुन्हे शोधक श्वान रेम्बो. तसेच सन 2019, 2020, 2022,2023 मध्ये डॉग शो केलेले आहेत. या आधी गोरेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनासाठी सिंधुदुर्गातील गुन्हे शोधक श्वान रेम्बोची निवड झालेली होती.
महाराष्ट्र पोलीस कर्तव्य 2023 स्पर्धेच्या समारोप कार्यक्रम पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातून 433 श्वान मधून टॉप 8 डॉगची निवड झाली. त्यामध्ये सिंधुदुर्गातील गुन्हे शोध शॉन रेम्बोची निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे सिंधुदुर्गाचे नाव आता महाराष्ट्रात गाजत आहे. तसेच श्वान रेम्बो याने सन 2023 मध्ये सावंतवाडी येथील लहू सावंत खून प्रकरणात संशयित आरोपी दाखवून, तसेच वैभववाडी येथील वयोवृद्ध महिला जयश्री साटम खुन प्रकरणात रात्रीच्या वेळी पाऊस व पाण्याचा अडथळा दूर करत आरोपीचे घर दाखवले होते.
गुन्हे शोधक श्वान रेम्बो डोबरमन जातिचा श्वान आहे. श्वान हस्तक अमित वेंगुर्लेकर, सुमीत देवळेकर आहेत. डॉग रेम्बो याने 2018 मध्ये श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषन विभाग शिवाजी नगर पुणे येते 9 महीन्याच ट्रेनिंग पूर्ण केलं आहे.