सिंधुदुर्ग : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) ई-शुभारंभ आणि फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन आज करण्यात आले. यावेळी राज्य शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना प्राधान्य दिले असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. तसेच आयआय केअर फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १२५ संगणकांचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी राज्य शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांना प्राधान्य दिले असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री अतुल सावे, आमदार मकरंद पाटील आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.