
कणकवली : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार - 2022 " डॉ रुपेश पाटकर यांच्या "अर्ज मधले दिवस" ला जाहीर करत आहोत. डॉ रुपेश पाटकर हे गोवा व बांदा जि. सिंधुदुर्ग येथील मनोविकार तज्ञ आहेत. अरुण पांडे व भीमव्वा चलवादी हे सामाजिक कार्यकर्ते या पुस्तकामागील प्रेरणा आहेत. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली,च्या शुभांगी पवार यांनी ही माहिती दिली.
'अर्ज मधील दिवस' हे शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच तिरस्करणीय, दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब व त्यांच्या पुनर्वसनाचे 'अर्ज' या सामाजिक संस्थेने केलेले प्रयत्न यांचा ज्यात उल्लेख आहे अशा अर्ज मधील दिवस ला हा पुरस्कार जाहीर करून शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा उद्देश आहे.
रोख रक्कम रुपये 10000 आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दि. 1 मार्च 2023 यादिवशी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात येणार आहे.














