संजय राऊत श्री 420 ; नितेश राणेंची पुन्हा एकदा जळजळीत टीका

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 28, 2023 13:17 PM
views 188  views

कणकवली : आरोपी नंबर ८९/५९ संजय राऊत यांच्या जामिणाची सुनावणी आजच आहे. भ्रष्टाचारी , ४२०असलेला हा संजय राजाराम राऊत प्रेस घेवून ज्ञान पाजळतो.उद्या गुंड दाऊद इब्राहिम, विजय माल्या  असे ज्ञान पाजळत असेल तर आम्ही ते सहन करायचे काय ?, लोकांचे पैसे खावून आमच्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेवर राऊत टीका करत असतील तर ती आम्ही सहन करणार नाही. के सी आर ही भाजपा ची बी टीम म्हणणारे संजय राजाराम राऊतांवर पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी जळजळीत टीका केली.

सामना हे राष्ट्रवादी चे मुखपत्र झाले आहे. ते शिल्लक सेनेचे राहिलेले नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष सोडून केसीआर सोबत जे नेते गेलेले त्याचे दुःख राऊत यांना झाले. आणि त्यामुळे ते  अस्वस्थ झाले आहेत.म्हणून केसीआर यांनी हे केले ते केले अशी टीका करत आहेत.मात्रा स्वतःचा पक्ष आणि मालक याना संपवून राऊत सेतची लायकी पहावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ची यादी वाचली त्या यादीत टीका करण्यासाठी सुद्धा तुमच्या पक्षाची जागा नाही यातूनच आपले काय लायकी राहिली आहे हे स्पष्ट होते. या यादीत तुझ्या मालकाचे नाव सुद्धा पंतप्रधानांनी घेतलेले नाही घेतले नाही.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मालक संपत चालला आहे. याची थोडी तरी चिंता संजय राऊत यांनी करावी असं सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.


मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच निघणारा पेंग्विन मोर्चा काढण्यास परवानगी देताना भायखळाच्या राणीच्या बागेत त्याचा समारोप झाला पाहिजे अशी परवानगी द्यावी कारण पेंग्विनला उष्ण वातावरण चालणार नाही राणीच्या बागेतील वातावरण थंड असल्याने तिकडे त्या मोर्चाचा समारोप करावा असा उपरोधिक टोला आमदार नितेश राणे यांनी आणला. 

संजय राजाराम राऊत यांच्या जामीनावरच ईडी विभागाची हरकत आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार पडणार अशी स्वप्ने पाहणारे राऊत यांना आमचे सरकार पाडता आलेले नाही मात्र यापुढे त्यांना जेलच्या अंधारा कोठडीत कविता आणि शायरी म्हणत दिवस काढावे लागतील असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी असल्याने त्याविषयी ते बोलत होते.

 खास.विनायक राऊत राऊत यांनी केलेली कोणतीही  दहा कामे  दाखवावित.राणे साहेब आणि आमच्यावर टीका करण्यापेक्षा  विकासा बद्दल बोलावे. असे त्यांनी सांगितले.