LIVE UPDATES

संजय गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 09, 2025 11:37 AM
views 64  views

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. जेवणामध्ये निकृष्ट दर्जाची आणि वास येणारी डाळ दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित (व्हायरल) झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, या मारहाणीच्‍या प्रकारावर आपल्‍याला कोणताही पश्‍चाताप नाही, असेही त्‍यांनी आज सकाळी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. 

नेमके काय घडले?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या रूम नंबर १०७ मधून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांना देण्यात आलेले जेवण, विशेषतः डाळ, अत्यंत निकृष्ट दर्जाची होती आणि तिला एक प्रकारचा वास येत होता. त्यांनी तातडीने कॅन्टीनमध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला.ही डाळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात मळमळू लागल्याचेही त्‍यांनी सांगितले. कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला थेट ठोसा लगावला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.