'सावंतवाडी' मतदारसंघाच्या किनारपट्टीतील २७ कोटींच्या कामांना मंजुरीचे आदेश

मंत्री केसरकरांच्या माध्यमातून सचिन वालावलकरांचा पाठपुरावा
Edited by: दिपेश परब
Published on: June 22, 2024 08:28 AM
views 650  views

वेंगुर्ले : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट सन २०२४-२५  निधी अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील सागरी किनारपट्टी भागातील काही महत्त्वाची कामे होण्यासाठी वारंवार येथील ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. तरी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या विभागांतर्गत त्या सूचित कामांना आगामी होणाऱ्या अर्थ संकल्पीय बजेट जुलै सन २०२४-२५ अंतर्गत समाविष्ट करून प्राधान्याने मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंदरविकास मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. 

   दरम्यान याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी पाठपुरावा केला होता. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा सर्वे नंबर ४३/८ खाडीलगत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी ५ कोटी, कवठणी सर्वे नंबर ४८ येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी २ कोटी, शेर्ले येथे लक्ष्मी भगवान सावंत यांच्या जमिनीलगत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १.५० कोटी, शेर्ले येथे भीमराव बाबाजी सावंत यांच्या जमिनीलगत संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी १.५० कोटी, आजगाव येथे दलित वस्ती ते तिरोडा खाजणादेवी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १.५० कोटी, कास येथे तेरेखोल खाडी पत्रामध्ये जेटी बांधणे या कामासाठी १.५० कोटी, वेंगुर्ला तालुक्यातील केळुस मोबारवाडी जलमाई मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, निवती श्रीरामवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, रेडी- तेरेखोल रस्ता भीम नगर येथे संरक्षण भिंत बांधणे १ कोटी, पाल गणेश कोंड ते अणसुर-पाल पुलापर्यंत खाडीपात्रात धूप  प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी,  शिरोडा- केरवाडा येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, परुळे- नेवाळकरवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, कर्ली- कोरजाई येथे संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, कोचरा दत्त मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, रेडी -लिंगेश्वर मंदिर जवळ संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी, नवाबाग समुद्रकिनारी संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी १, किल्ले- निवती भोगवे येथे संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १, वायंगणी पोयंडेवाडी येथे खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी १ कोटी अशा एकूण २७ कोटींच्या कामांची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंदरविकास मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. 

    याबाबत सदर कामांना मंजुरी देण्याचे आदेश बंदरविकास मंत्री  संजय बनसोडे यांनी दिले आसल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली आहे.