सदगुरू गावडेकाकांचा वाढदिवस भक्तीपूर्ण वातावरणात साजरा

प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत ३१ रुग्ण दत्तक | 'कोकणसाद'च्या वाढदिवस विशेष पुरवणीचं शानदार प्रकाशन
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 01, 2023 12:03 PM
views 173  views

कुडाळ : श्री श्री १०८ महंत मठाधिश प.पू. सदगुरू गावडे काका महाराज यांचा वाढदिवस  माड्याची वाडी इथं  भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला.


या वाढदिवसाचे औचित्य साधुन सदगुरू गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान या केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी  होऊन दातृत्व भावनेने  ६ महीन्याकरीता ३१ रुग्णांना दत्तक घेण्यात आले. त्यांना प्रोटीन युक्त आहाराचे शिधा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आरोग्य विभाग कर्मचारी  लक्ष्मण कदम, अनिरूध्द चव्हाण, सुरेश मोरजकर, सिध्देश राणे हे उपस्थीत होते.




संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय किनळेकर यांनी सर्वाचे स्वागत केले. यावेळी क्षयरोग रूग्णांना शिधा वाटप करण्यात आला. समाजातील अशा अनेक तळागाळातील लोकांना संस्थेच्या माध्यमातून सहकार्य मिळावे व जगण्यास प्रेरणा मिळावी यासाठी मुकबधीर असलेली आर्टीस मुलगी कु. पुजा रुपजी दुरी हिचा सदगुरू यांच्या हस्ते सन्मान करून आर्थीक मदत  देण्यात आली. कँन्सर ग्रस्त रूग्ण सुगंधा सुनील सरमळकर यांना वैद्यकीय उपचारासाठी संस्थेच्या वतीने आर्थीक मदत देण्यात आली.




यावेळी कोकणचे पहिले दैनिक कोकणसादने प्रकाशित केलेल्या सदगुरू गावडे काका महाराज यांच्या वाढदिवस विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदगुरू गावडे काका महाराज, कोकणसाद LIVE व कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. 


 


सदगुरु गावडेकाकांनी आपले विचार मांडताना म्हणाले, मला एकेका घराला दुखा:तुन मुक्त करायच आहे, हे माझे आद्य कर्तव्य आहे व ते मी पूर्ण करणार आहे. दुस-याला उपचारासाठी मदत करणे हि एक सेवा आहे. एखाद्याला जेवण देणे, एखाद्याचे दुख: पुसणे हि पण एक सेवा आहे. ज्यातून आपणाला परमेश्वर कृपा प्राप्त होते. अध्यात्माच्या वाटेवर चालताना  मला माझा व्यवसाय सांभाळुन  सेवा करण्यास आनंद  मिळतो. हा आनंद तूम्हीही घ्या. सदगुरू च्या माध्यमातून राबवलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील.



यावेळी एकनाथ गावडे, दत्तात्रय किनळेकर, विजय साहील, पंकज कामत, प्रिती कुशे, अंजली पावसकर, बापू गावकर श्रीकृष्ण पाटकर, राजु वाळके, श्वेता कोरगांवकर, भास्कर गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश केसरकर यानी केले.