रुपाली चाकणकर 19 डिसेंबरला सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग दौरा कसा असेल ?
Edited by:
Published on: December 17, 2024 20:24 PM
views 450  views

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि.19 डिसेंबर 2024 रोजी  सकाळी 11 ते दु.2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जनसुनावणी. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता जिल्हा आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4 वाजता पत्रकार परिषद. सायं. 4 ते 6 वाजता महिला संघटना बैठक. सायं.6 वाजता सिंधुदुर्ग येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.