रोहित पवार सुप्रिया सुळे गटाचा पप्पू ; नितेश राणे

Edited by: ब्युरो
Published on: July 10, 2023 19:29 PM
views 399  views

सिंधुदुर्ग: “रोहित पवारांचे वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली,” असा आरोप अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “रोहित पवार हे सुप्रिया सुळे गटाचे पप्पू आहेत. प्रत्येक पक्षाचा पप्पू असतो, जसं काँग्रेसचे पप्पू राहुल गांधी, उबाठाचे आदित्य ठाकरे तसं सुळे गटाचा पप्पू म्हणजे रोहित पवार आहेत. रोहित पवार यांनी पहिलं आपलं घर सांभाळावं,” असं नितेश राणे म्हणाले.