
सावंतवाडी : एन्काऊंटर झालेल्या रोहीत आर्या यांची स्वच्छता मॉनिटर संकल्पना राबविण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मधल्या काळात मुलांकडून त्यांनी पैसे वसूल केले. ते परत करण्याची पूर्तता न झाल्यानं त्यांचे बील पेडींग राहिलं. ओलीस ठेवणं हे चुकीचं आहे. मी त्या खात्याचा आता मंत्री नाही, माझ्याशी चर्चा करून काही झालं नसतं. मात्र, मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे. मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो असे मत माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, यापूर्वी मी त्यांना सहानुभूतीपूर्वक मदत केली होती. चेक न पैसे त्यांना दिलेत, माझी भूमिका सहकार्याची होती. मात्र, डिपार्टमेंटच्या फॉर्म्युला पार पाडण आवश्यक होतं. चुकीचा पायंडा पाडण योग्य नाही. बील अदा झालं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचलण सोपं नाही अस मत श्री.केसरकर यांनी व्यक्त केल.यावेळी आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.














