सावंतवाडी : २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज अर्चना घारे-परब यांचे संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पार पडली.
आज झालेल्या बैठकी वेळी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी अध्यक्ष सौ. अर्चना घारे- परब, प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हाध्यक्ष रेवतीताई राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, वेंगुर्ला महिला तालुका अध्यक्ष दीपिका राणे, सावंतवाडी शहरअध्यक्ष देवा टेमकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस हिदयतुला खान, सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस , चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, अल्पसंख्यांक सेल महिला अध्यक्ष मारीता फर्नांडिस, युवती तालुका अध्यक्ष सुधा सावंत, नितीशा नाईक, पूजा दळवी, सुनीता भाईप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्या मध्ये दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील मॅंगो वन या ठिकाणी रोहिणी ताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी बैठक होईल. त्यात त्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर पत्रकार परिषद होईल. अशी माहिती अर्चना घारे - परब यांनी दिली.
प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या येण्याने सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महिला संघटनेसाठी बळ मिळेल, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. संघटना वाढीसाठी त्यांच्या येण्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने निश्चितच फायदा होईल. असा विश्वास यावेळी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी अध्यक्ष सौ. अर्चना घारे- परब यांनी व्यक्त केला.