केंद्रीय कर्मचारी लाच मागत असल्यास थेट तक्रार करा

Edited by:
Published on: May 02, 2024 14:14 PM
views 307  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय खाती सीबीआयच्या अखत्यारीत येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुुठल्याही केंद्रीय खात्यात काम करणारे किंवा राष्ट्रीयकृत बँका मध्ये काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेत असतील किंवा आर्थिक गैरव्यवहार करत असतील तर थेट सीबीआय खात्याशी संपर्क करावा असे आवाहन सीबीआयच्या मुबंई विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक प्रेम कुमार यांनी येथे पत्रकार परिषद मध्ये बोलताना केले व तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल व संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.

सीबीआयचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ.सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय मुंबई विभागामार्फत लाच घेणाऱ्या किंवा आर्थिक घोटाळा करणाऱ्या केंद्रीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबत तक्रारी करण्यासाठी लोक पुढे येण्यासाठी जनजागृति करण्यात येत आहे याच अनुषगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातहि तक्रार करण्यास लोक पुढे यावेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो असल्याचे सीबीआय अधिकारी पोलीस निरीक्षक प्रेम कुमार यांनी सांगितले यावेळी सोबत पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार उपस्थित होते.

सीबीआय खात्यातर्गत केंद्रीय सर्व खाती येतात त्यामध्ये पोस्ट ऑफिस,रेल्वे,बीएसएनएल ,इन्कमटॅक्स, जीएसटी , एलआयसी , ईसआयसी , न्यू इंडिया इंशयुरन्स ,सर्व राष्ट्रीकृत बँका अशी अनेक केंद्रीय खाती सीबीआयच्या अखत्यारीत येतात या खात्यातील अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेत असतील किंवा आर्थिक घोटाळा करत असतील तर थेट सीबीआय खात्याकडे तक्रार करावी ९८६७४७२९७३ या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सअप वरही तक्रार करावी तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल व निशितपणे लाच घेणाऱ्यावर किंवा घोटाळा करणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल असे सीबीआय अधिकारी प्रेम कुमार यांनी सागितले 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी बीएसएनएलच्या मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई केली होती त्यानंतर एकही तक्रार आलेली नाही त्यामुळे जनजागृती करण्यासाठी सीबीआय च्या मुंबई कार्यालयातून सिंधुदुर्ग मध्ये यावे लागले आहे तक्रारी वाढल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीबीआय चे कार्यालय सुरु करण्यात येईल असेही सागितले लाच मागणे किंवा आर्थिक घोटाळा करणे यामध्ये अनेक प्रकार आहेत परतू प्रकार कुठलाही असो तो शोधून काढून कारवाई करणारच असे सागितले.

बँका मधेही कर्ज मंजुरीसाठी लाच मागितली जाते किंवा कर्ज करण्यासाठी घोटाळा केला जातो तसेच हल्ली रोख स्वरूपात रक्कम न घेता डिजिटलं व्यवहारा द्वारे लाच घेतली जाते किंवा वस्तू स्वरूपात लाच घेतली जाते बेहिशोबी मालमता याबाबतही तक्रार लोक करू शकतात त्यामुळे अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कशीही लाच घेतली तरी त्यांना आम्ही पकडणारच फक्त तक्रार करण्यासाठी लोकांनी पुढे यावे सीबीआय कार्यालय मुंबई येथील ०२२ २६५४३७०० या नंबरवर थेट संपर्क करावा असे आवाहन प्रेम कुमार यांनी केले आहे तसेच शुक्रवार दिनांक ३ मे रोजी मालवण पोस्ट ऑफिस येथे असणार आहोत तेथेही भेट घेऊन थेट तक्रार करू शकता असे सागितले