रतनजी टाटा पहिल्या 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 20, 2023 21:15 PM
views 205  views

मुंबई : भारतीय उद्योग क्षेत्राच्या उत्तुंग प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणारे टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, रतनजी टाटा यांना पहिल्या 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळातच 'टाटा म्हणजे साधेपणा' अशी ओळख असल्याने त्यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोर्ट्रेटही त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा उपस्थित होते.